महानिर्वाण
लोकजागृतीसाठी, शिक्षणप्रसारासाठी आणि संस्थेला मदत गोळा करण्यासाठी भाऊराव आयुष्यभर अनवाणी पायानी व उघड्या माथ्याने उन्हापावसातून हिंडत होते. त्याच्या प्रकृतीवर याचा परिणाम जाणवू लागला. ते तेवरचेवर आजारी पडू लागले. संधीवात, रक्तदाब व रुदय विकार यांच्या उपचारासाठी त्यांना अनेकदा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावे लागले होते. हॉस्पिटल मधून बाहेर पडताना मिळालेला विश्रांतीचा सल्ला त्यांनी कधीच पाळला नाही. बाहेर पडले की कार्यरत होऊन जाते.सन 1959 मध्ये उपचारासाठी ते पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले. यापूर्वी हृदयविकाराच्या अनेक झटक्यातून ते सावरले होती. डॉक्टरांच्या अपेक्षेपेक्षा किमान दहा वर्षे ते अधिक जगले होते. केवळ इच्छाशक्ती बाळावर. ता. 9मे 1959 रोजी हृदयविकाराचा झटका येऊन भाऊरावांचे पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये निधन झाले. निधनसमयी त्यांच्या मृत्यूशय्येजवळ त्यांचा एक हरिजन विद्यार्थी होता.
No comments:
Post a Comment